काय ग सखू ?
बोला दाजिबा !
काय गं सखू, बोलू का नगू,
घडिभर जरा थांबशील का ?
गोड गोड माझ्याशी बोलशील का ?
काय सांगू बाई, लई मला घाई
दाजिबा बोलायला येळच नाही !
येळच नाही ?
दाजिबा थांबायला येळच नाही !
डोईवर घेऊन चाललीस काई ?
डोईवर पाटी, पाटीत भाकरी, भाकरीवर तांब्या
तांब्यात दूध हाय गाईचं, घेता का दाजिबा वाईचं ?
काय गं सखू, रागावू नगू,
घडीभर जरा थांबशील का ?
थांबशील का गं, जातीस कुठं तू सांगशील का ?
रानाच्या वाटं घेताय भेट
दाजिबा तुमचं वागणंच खोटं
वागणंच खोटं ?
पहाटेच्या पारी तू चाललीस कुठं ?
पहाटेच्या पारी, घेऊन न्यारी, बाई लौकरी,
जाते मी पेरुच्या बागात, येऊ नका दजिबा रागात
काय गं सखू, घाबरू नगू,
घडीभर जरा थांबशील का ?
मनात काय तुझ्या सांगशील का ?
सांगू कशी मी कस्कसं होतं
मनात माझ्या भलतंच येतं
काय गं सखू तुझ्या मनात येतं ?
दुखतंय कुठं कळंना नीट, लाज मला वाटं
दाजिबा तुम्हाला माहीत, जायाचं का आंबराईत ?
चल चल सखू, चल गं सखू
जावा दाजिबा, अहो जावा दजिबा !