माझे मन तुझे झाले
तुझे मन माझे झाले
माझे प्राण तुझे प्राण
उरले ना वेगळाले
मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तुझे होती भास
माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तुझ्यामाझ्यातले सारे
गुज माझ्यातुझ्यापाशी
तुझी माझी पटे खूण
तुझी माझी हीच धून
तुझे प्राण माझे प्राण
माझे मन तुझे मन