साजणी, नभात नभ दाटून आले
कावरे मन हे झाले, तू ये ना साजणी
सळसळतो वारा, गार गार हा शहारा
लाही लाही धरतीला, चिंब चिंब दे किनारा
तुझ्या चाहुलीनं ओठी येती गाणे
साजणी, छळतो मज हा मृद्गंध
तुझ्या स्पर्शासम धुंद, तू ये ना साजणी
रिमझिम रिमझिम या नादान पायी, शिवार झालं बेभान
सये भिजूया रानात मनात पानात हसू दे सोन्याचं पाणी
हुरहूर लागी जीवा नको धाडू गं सांगावा
ये ना आता बरसत ये ना
गुणगुणते ही माती, लवलवते ही पाती
सर बरसे सयींची रुजवाया नवी नाती
तुझ्या चाहुलीनं ओठी येती गाणी