Title (Indic)मला हो म्हणतात लवंगी मिरची WorkRanglya Ratri Asha LanguageHindi Credits Role Artist Music Vasant Pawar Performer Sulochana Chavan LyricsHindiनाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची मला हो म्हणतात लवंगी मिरची हा डौल झोक हा नटारंगीचा ढंग वाऱ्यावर लवते जशी चवळीची शेंग हर घडीला नखरा नवा, डोळा हो डावा झाकुनी फेकिन नजरेची बरची हा लाल डाळींबी शालू पदर जरतारी ही हिरवी हिरवी चोळी तंग भरदारी नका पाहू न्याहाळुन अशी, पडाल तुम्ही फशी जणु मी नागीण झाडावरची या तिखटपणावर जाऊ नका हुळहुळून घायाळ शिकारी हरिणी जाईल पळून हिरव्या रानात दिसते उठून, नका घेऊ खुडून अहो मी पाव्हणी बारा घरची