You are here

Bandhale Mee Bandhale

Title (Indic)
बांधले मी बांधले
Work
Language
Credits
Role Artist
Music Bhaskar Chandavarkar

Lyrics

Hindi

बांधले मी बांधले
इंद्राचे तोरण बांधले
शिंपण घातले, चाफ्याचे शिंपण घातले

उन्हाचे पाटव नेसले, टाकले
वाऱ्याचे पैंजण घातले, फेकले
डोळ्यांत काजळ केवडा, अत्तर
लावले, पुसले

हर्षाचे हिंदोळे सोडले, बांधले
मयूर मनाचे रुसले, हासले
हिंदोळे हर्षाचे, मयूर मनाचे
हासले, नाचले

दिसला, लपला चकोर मनाचा
फुलला, ढळला बहर चंद्राचा
लामण सूऱ्याचा, श्रावण नेत्राचा
विझले, तेवले

Lyrics search