Title (Indic)चल ग सखे, चल ग सखे पंढरीला Work(N/A) LanguageHindi Credits Role Artist Writer Datta Patil LyricsHindiपुंडलीका वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चल ग सखे, चल ग सखे पंढरीला तू ध्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव चल भेटू विठ्ठल रखुमाईला चंद्रभागा नदीतीरावर मंदिर विठ्लाचे सुंदर देव आहे उभा विटेवर ठेऊनी दोन्ही कर कटेवर ते पाहू त्यांचे रूप लाऊ उद आणि धूप करू वंदन प्रभूच्या मूर्तीला देवाच्या दारी कुणा ना बंदी दुःखी पीडित होती आनंदी दुर्जन होती भक्तीचे छंदी आली चालून छान ही संधी तू दे हातात हात उद्या चल ग धरू वाट पाहू डोळे भरूनि जगजेठीला वाली गरिबांचा पंढरपुरात दर्शन घेऊ जोडुनी हात तोच देईल संकटी साथ नांदू संसारी दोघे सुखात तुला सांगतो त्रिवार नको देऊ तू नकार आज दत्तात्रयाच्या वाणीला