कधी वाटे मन का हरवते
आसू लपवून का मिरवते
हे प्रेम की यातना
नवे नाते रोज गोड भेटी
आता सजा नाव येता ओठी
हे प्रेम की यातना
आजुबाजू मोठी कुंपणे, नको मरणाला जुंपणे
हे प्रेम की यातना
पाखरू हृदयातले मनमानी करी
बहर ते कोमेजले, वणवा का उरी
मनास वाटले, डोळ्यात साठले
आभाळ फाटले का अंतरी
आठवती सारे राग रुसवे
नाही खरे काही भास फसवे
हे प्रेम की यातना
शोधतो घरटे नवे जुने सोडू कसे
प्रेम ही आराधना का होई हसे
कुणास जोडते, कुणास तोडते
दुःखाची वाट ही नाही बरी
ध्यास म्हणावा की आस वेडी
हसू पाप, रडण्याची चोरी