उन वेड्या पावसात न्हाणं , चिंब भिजलं माझं गाणं
बेभान बेभान बेभान माझं गाणं
पंख फुटती गाण्याला, पंखावरती रंग
रंगले रंगात रंग, जसा दंग दंग दंग होई मृदंग
मृदंग दंग, दंग्याचं हे गाणं
मातीचा येतो वास, तो वास म्हणजे गाणं
मृद गंध गंध गंधाराचं गाणं
कधी गडद गडदशा अंधाराचं गाणं
कधी पेटून उठल्या अंगाराचं गाणं
कधी खोल खोल खोल घेऊन जातं गाणं
कधी बोल बोल बोल म्हणतं गाणं
खिडकी खोल खोल खोल म्हणतं गाणं
उघड्या खिडकी मधून येतं हलक्या हलक्या पिसासारखं गाणं
उन वेड्या पावसात न्हाणं, चिंब भिजलं माझं गाणं
बेभान बेभान बेभान माझं गाणं
कधी येतं गिरक्या घेऊन, कधी येतं फिरक्या घेऊन
कधी बनून जाई विराणी, कधी सांगे एक कहाणी
कधी हिरमुसतं , कधी मुसमुसतं
बेबंद फुटले आसू म्हणती गाणं
उन वेड्या पावसात न्हाणं, चिंब भिजलं माझं गाणं
बेभान बेभान बेभान माझं गाणं
कधी स्पेशल स्पेशलशा दिवसांचं गाणं
कधी स्पेशल स्पेशल दोस्तासाठी गाणं
जनात दिसतं , मनात असतं , तनात रुजतं गाणं
रानात घुमतं, कानात रुंजी घालत राही गाणं
गाणं तुझं , गाणं माझं , गाणं तुझं माझं गाणं
तुझ्या गिटारच्या या कॉर्डस म्हणती गाणं गाणं
माझ्या गळ्यातल्या व्होकल कॉर्डस म्हणती गाणं गाणं
तारा छेडल्या जातात ना तेव्हाच होतं गाणं
उन वेड्या पावसात न्हाणं, चिंब भिजलं माझं गाणं
बेभान बेभान बेभान माझं गाणं