Title (Indic)घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला Work(N/A) LanguageHindi LyricsHindiघनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती काढी धार क्षीरपात्र घेऊनी धेनु हंबरती लक्षिताती वासुरें हरी धेनु स्तनपानाला उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला सायंकाळी एकेमेळी द्विजगण अवघे वृक्षी अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी प्रभातकाळी उठुनि कावडी तीर्थ पथ लक्षी करूनी सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षी यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षी कोटी रवीहूनि तेज आगळे तुझिया वदनाला होनाजी हा नित्य ध्यातसे हृदयी नाममाला उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला