Me Aale Nighale

मी आले, निघाले
Year
Language

मी आले, निघाले,
सजले, फुलले, फुलपाखरू झाले
वेग पंखांना आला असा
आला या लकेरी, घेतली भरारी
तुफानापरी बेभान मी झाले

नील नभातून विहरत जाऊ लहरत पाण्यावरी
जीवन जगूया रंग मजेचे उधळीत स्वप्नापरी
यौवन म्हणजे गंमत जंमत सुख हे जन्मातले

तोडून टाकू बंध पुराणे जाऊ चल नवतीकडे
फुल पंखांनी मारू भरारी झेप घेऊ आता पुढे
आनंदाचे विश्वच आम्ही येथे केले खुले