कधी कुठे कशी निनावी
अनोळखी मने जुळावी
युगायुगांची ही बंधने
नवे नवे अधीर नाते
हवे हवेसे होत जाते
फुलांपरी हळवे कोवळे
मन असे गुंतता, बहरली स्पंदने
बरसल्या अक्षता, बांधली कंकणे
जोडली रेशमी बंधने
भावनांचे गोड नाते
स्वप्नांतले झाले खरे
सप्तकाची पाऊले मनी
उमटली जणू जन्मांतरी
सूर नवे छेडता, विरली ही अंतरे
जोडली रेशमी बंधने
मोहणारे सात फेरे
स्वप्ने नवी सामावली
अमृताचे स्पर्श कोवळे
वेडी ओढ ही श्वासांतली
क्षण असे वेचता, प्रीत ही रंगली
जोडली रेशमी बंधने