Title (Indic)कामापुरता मामा, ताकापुरती आजी WorkKamapurta Mama Year1965 LanguageHindi Credits Role Artist Music Yashwant Dev Writer Yashwant Dev LyricsHindiकामापुरता मामा, ताकापुरती आजी जोवर पुरवू हट्ट तोवरी पत्नी असते राजी मित्र म्हणोनि जवळ कराया कोणी योग्य दिसेना तुटून पडते नाण्यावरती सारी वानरसेना तोंडापुरती गोडी, पाठीवर चहाडी पैशावाचून वैद्य बघेना पिडलेल्याची नाडी लग्नाआधी जावई मागे जागा संसाराला पैशावाचून फुटे न अंकुर प्रेमाच्या बीजाला नाती ना रक्ताची, विरघळत्या मेणाची काका, मामा, बंधू, भगिनी सगळी हो स्वार्थाची पैसा असता मान-मरातब, सलाम करतील सारे अधनावस्था पाहून म्हणतील दूर निघोनि जा रे हात करावा ओला, तेव्हा पुढचं बोला गरिबासाठी येतील का ती, त्याला कुणीही टोला