अवखळसे स्पर्श ते, हरवले का असे, तू मला सांग ना, सांग ना
दरवळती भोवती भास सारे तुझे का असे सांग ना, सांग ना
गुरफटला जीव हा सोडवू मी कसा, तू मला सांग ना, सांग ना
चालता चालता हरवली सावली, पाऊले गुंतता वाट भांबावली
साद देती तरी का तुझ्या चाहुली, तू मला सांग ना, सांग ना
आठवांचे तुझ्या चालती सोहळे, रोखले मी तरी पापणी ओघळे
आवरू या मना मी कसे या क्षणी तू मला सांग ना, सांग ना