जे जे सुंदर ते माझे घर
मी तर आहे मस्त कलंदर
मस्त कलंदर.. ओ हो
अडलेल्यांना देतो हात
एकाक्याची करितो साथ
सुखदुःखी मी शांत राहतो
पुढेच जातो, गाणी गातो
श्रमुनि कमवितो माझी भाकर
मी तर आहे मस्त कलंदर
मस्त कलंदर.. ओ हो
जीवन म्हणजे केवळ वाट
केव्हा उतरण केव्हा घाट
ध्येय ध्येयसे वाटे लोका
चुकून लाभते कोणा एका
म्हणून चालतो असा निरंतर
मी तर आहे मस्त कलंदर
मस्त कलंदर.. ओ हो
सहपथिकांनो डरता काय
उगीच डोळे भरता काय
चाले त्याचे भाग्य चालते
थांबे त्याचे दैव थांबते
उचला पाऊल, उचला सत्वर
मी तर आहे मस्त कलंदर
मस्त कलंदर.. ओ हो