Title (Indic)पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकायला पोळी Year1961 LanguageHindi Credits Role Artist Writer G. D. Madgulkar LyricsHindiपोटापुरता पसा पाहिजे, नको पिकायला पोळी देणार्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी हवाच तितुका पाडी पाऊस देवा, वेळोवेळी चोचीपुरता देवो दाणा माय-माऊली काळी एक वितिच्या भुकेस पुरते तळहाताची पोळी महाल, माड्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया गरजेपुरती देई वसने, जतन कराया काया गोठविणारा नको कडाका नको उन्हाची होळी सोसे तितुके देई याहून हट्ट नसे गा माझा सौख्य देई वा दुःख ईश्वरा रंक करी वा राजा अपुरेपणही नलगे नलगे प्रस्तावाची पाळी