Title (Indic)पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव WorkRamdas Kamat songs LanguageMarathi Credits Role Artist Performer Ramdas Kamat LyricsMarathiपूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव प्रभातीच येशी सारा जागवीत गाव विधाता जगाचा तूची उधळीत आशा उजळिशी येता येता सभोवती जग दिशा रथ तुझा सोनियाचा धावे भरधाव अंधारास प्रभा तुझी गिळे प्रभाकर दिवसा तू ज्ञानदीप लावी दिवाकर सृष्टीला या चैतन्याचा तुझा पेहराव पुष्पपत्रदानाची रे तुला नसे आस तूच चालुनिया येशी माझिया घरास भक्ताठायी गुंतलासे तुझा भक्तिभाव