Ha Rusava Sod Sakhe

सोड ना अबोला
Work
Language

हा रुसवा सोड सखे
पुरे हा बहाणा, सोड ना अबोला
झुरतो तुझ्याविना, घडला काय गुन्हा
बनलो निशाणा, सोड ना अबोला

इश्काची दौलत उधळी तुझा हा नखरा
मुखचंद्राभवती कितीक फिरती नजरा
फसवा राग तुझा, अलबेला नशीला, करी मदहोश मला
नुरले भान आता, जाहला जीव खुळा
पुरे हा बहाणा, सोड ना अबोला

तुझे फितूर डोळे गाती भलत्या गजला
मदनाने केले मुश्किल जगणे मजला
पाहुनी मस्त अदा, फुले अंगार असा, सावरू तोल कसा
नको छळवाद आता, झालो कुर्बान तुला
पुरे हा बहाणा, सोड ना अबोला