Ye Javali Ghe Javali

ये जवळी घे जवळी
Language

ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता
वेढुनि मज राहसी का दूर दूर आता

रे सुंदर तव तीरी जग हिरवे धुंद उरी
पातेही न गवताचे शोभवि मम माथा

निशिदिनी या नटुनि थटुनि बघ नौका जाति दुरुनि
स्पर्शास्तव आतुर मी दुर्लभ तो हाता

चमचमती लखलखती तव मंदिरी दीप किती
झोपडीत अंधारी वाचु कशी गाथा