या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती
या डोळयांची दोन पाखरे फिरतिल तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती
दर्शन तुमचे हाच असे हो या पक्ष्यांचा चारा
सहवासविण नकोच यांना अन्य कोठचा वारा
तुमचा परिसर यास नभांगण, घरकुल तुमची छाती
सावलीत ही बसतील वेडी प्रीतीच्या दडुनी
एका अश्रुमाजी तुमच्या जातील पण बुडूनी
नव्हेत डोळे, नव्हेत पक्षी, ही तर अक्षय नाती
yā ḍoḻyāṅchī don pākhre phirtil tumachyā bhavtī
pāṭhlāg hī sadaiv kartīl asā kuṭhehī jagtī
darśhan tumche hāch ase ho yā pakṣhyāṅchā chārā
sahvāsviṇ nakoch yāṅnā any koṭhchā vārā
tumchā parisar yās nabhāṅgaṇ, gharkul tumchī chhātī
sāvlīt hī bastīl veḍī prītīchyā daḍunī
ekā aśhrumājī tumachyā jātīl paṇ buḍūnī
navhet ḍoḻe, navhet pakṣhī, hī tar akṣhay nātī