विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम
नाही खर्चीली कवडी दमडी, नाही वेचला दाम
विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम
कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी
जन्मभरीच्या श्वासाइतुके, मोजियले हरिनाम
बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संता घरचा
हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम
जितुके मालक, तितकी नावे, हृदये तितकी याची गावे
कुणी न ओळखी तरीही याला, दीन अनाथ अनाम
nāhī kharchīlī kavḍī damḍī, nāhī vechlā dām
vikat ghetlā śhyām, bāī mī vikat ghetlā śhyām
kuṇī mhṇe hī asel chorī, kuṇā vāṭte ase udhārī
janmabhrīchyā śhvāsāituke, mojiyle harinām
bāḻ gurākhī yamunevarchā, gulām kāḻā saṅtā gharchā
hāch tukyāchā viṭhṭhal āṇi dāsāchā śhrīrām
jituke mālak, titkī nāve, hṛdye titkī yāchī gāve
kuṇī na oḻkhī tarīhī yālā, dīn anāth anām