शरदाचे चांदणे मधुवनी, फुलला निशिगंध
नाचतो गोपीजनवृंद वाजवी पावा गोविंद
पैंजण रुणझुणती
मेखला कटिवर किणकिणती
वाहते यमुनाजळ धुंद
वारा झुळझुळतो
फुलांचा सुगंध दरवळतो
सांडतो भरुनी आनंद
धरुनिया फेर हरीभवती
गोजिऱ्या गोपी गुणगुणती
आगळा रासाचा छंद
शरदाचे चांदणे मधुवनी, फुलला निशिगंध
नाचतो गोपीजनवृंद वाजवी पावा गोविंद
पैंजण रुणझुणती
मेखला कटिवर किणकिणती
वाहते यमुनाजळ धुंद
वारा झुळझुळतो
फुलांचा सुगंध दरवळतो
सांडतो भरुनी आनंद
धरुनिया फेर हरीभवती
गोजिऱ्या गोपी गुणगुणती
आगळा रासाचा छंद
śhardāche chāṅdṇe madhuvnī, phullā niśhigaṅdh
nāchto gopījanvṛṅd vājvī pāvā goviṅd
paiṅjaṇ ruṇjhuṇtī
mekhlā kaṭivar kiṇkiṇtī
vāhte yamunājaḻ dhuṅd
vārā jhuḻjhuḻto
phulāṅchā sugaṅdh daravaḻto
sāṅḍto bharunī ānaṅd
dharuniyā pher harībhavtī
gojiऱyā gopī guṇguṇtī
āgḻā rāsāchā chhaṅd