Uth Re Raghava

ऊठ रे राघवा
Work
Language

ऊठ रे राघवा, उघड लोचन आता

सूर्य क्षितिजावरी कांचनाच्या रथी
रत्नकण सांडले या सुनिर्मल पथी
देव प्राचीवरी उधळती वैभवा

पाखरांचे गळे जाहले मोकळे
किरण पाण्यावरी उतरले कोवळे
उमलल्या पाकळ्या जाग ये राजिवा

जाग रे राजसा, संपली ही निशा
गंध चोहीकडे, उजळल्या दशदिशा
तेज आनंद रे तूच माझ्या जिवा