Udhalit Ye Re Gulal

उधळीत ये रे गुलाल सजणा
Language

उधळीत ये रे गुलाल सजणा
तू श्याम मी राधिका
तुला शोधू कशी, झाले वेडीपिशी
तू ये ना, मज ने ना, अरे ये ना कान्हा

चांद बिलोरी, रात अधीरी
प्रीत माधुरी तू देऊन जा
धुंद होऊनी रास खेळुनी
पुनवेच्या राती मला घेऊन जा
रंग आला अती, वाट पाहू किती
तू ये ना, मज ने ना, अरे ये ना कान्हा