Tyanich Chhedile Ga

त्यांनीच छेडिले ग, माझ्या मनी न होते
Work
Language

त्यांनीच छेडिले ग, माझ्या मनी न होते
ओढून ओढणीला दारी उभी मी होते

करपाश तोचि आले कंठी गडे तयांचे
भारावल्या मनाने मी ग अबोल होते

अपराध काही नसता, शिक्षा मला मिळाली
माझ्याच मंदिरी ग मी बंदिवान होते

दिनरात साजणाचे बेबंद वागणे हे
असते सुखात जर का मी बालिकाच होते