तुला पाहते रे, तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते
तुला पाहते रे, तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते
तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे
तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे
तुझ्या गायने मी सुखी नाहते
किती भाग्य या घोर अंधेपणीही
दिसे स्वप्न झोपेत, जागेपणीही
उणे लोचनांचे सुखे साहते
कधी भक्त का पाहातो ईश्वराला
नदी न्याहळी का कधी सागराला
तिच्या सारखी मी सदा वाहते