Tula Te Aathvel Ka Sare

तुला ते आठवेल का सारे?
Work
Language

तुला ते आठवेल का सारे?
दवांत भिजल्या जुईपरी हे मन हळवे झाले रे

तुझ्या करांतील मोरपीस ते
अजून गालांवरुनी फिरते
बनांतुनी केतकीच्या येती सुगंध शिंपित वारे

त्या तरुवेली, तो सुमपरिमळ
झऱ्यांतील चांदीची झुळझुळ
आठवणींच्या चिंचा गाभुळ रुचतिल काय तुला रे

ते सारे मी हृदयी जपते
उगीच लाजते, उगीच हसते
हृदयामधल्या देवासाठी हवेत का देव्हारे?