सुरावटीवर तुझ्या उमटती
अचूक कशी रे माझी गझले
कशास पुससी प्रश्न प्रेयसी
तुला समजले, मला समजले
मला समजले, तुला समजले
काल रात्री मी जाग जागलो
अवघे जग जरी होते निजले
जागरणाचे कारण राजा
तुला समजले, मला समजले
मला समजले, तुला समजले
तीन दिवस ना भेट आपुली
कितीदा माझे डोळे भिजले
आसू मागील भाव अनामिक
तुला समजले, मला समजले
मला समजले, तुला समजले