आभाळी धन दाटून आले, मन वेडे ओथंबले
मेघांच्या रंगात भिजूनी, क्षण झाले सावळे
रिमझिम, रिमझिम झरताना, हळवी दुपार कलताना, तुझिया स्मृतींच्या वेदना
विझता विझता जळताना, तुझ्यासवे भिजलो तू नसताना, भिजले हे मन पुन्हा
स्मरणाच्या देशी पाऊस आला, थेंबांचा सूर ही कातर झाला
झाडांच्या ओठी थरथर ओली, वारा तुझिया शोधत निघाला
पडदा अलवार सरींचा बाजूस सारुनी थोडा, ये ना ये ना आता तू ये ना
क्षण आले सारे तो क्षण नाही, माझ्या भिजण्याचे कारण नाही
डोळ्यांची वेस कोरडी खाली, वादळ शमणार तुझाविण नाही
शपथा घनगर्द धुक्याच्या तोडून टाक ना साऱ्या, ये ना ये ना आता तू ये ना