तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा
गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा
जागेपणी मी पाहिले, ते सत्य सारे देखणे
माझे मला आले हसू, आकाश झाले ठेंगणे
निमिषात सारे संपले, हुंकार ये प्रितीचा
तू छेडिता माझ्या मना, तारा अशा झंकारल्या
माझ्यासवे येताच तू दाही दिशा गंधाळल्या
हे हासणे अन् लाजणे हा खेळ ऊन पावसाचा
तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा
Work
Language
tū saptsūr mājhe, tū śhvās aṅtrīchā
gāṇyās lābhlā hā tav sparśh amṛtāchā
jāgepṇī mī pāhile, te saty sāre dekhṇe
mājhe malā āle hasū, ākāśh jhāle ṭheṅgṇe
nimiṣhāt sāre saṅple, huṅkār ye pritīchā
tū chheḍitā mājhyā manā, tārā aśhā jhaṅkāralyā
mājhyāsve yetāch tū dāhī diśhā gaṅdhāḻlyā
he hāsṇe an lājṇe hā kheḻ ūn pāvsāchā