तू नजरेने हो म्हटले मग वाचेने वदणार कधी?
तू नजरेने 'हो' म्हटले मग वाचेने वदणार कधी ?
कर पडलेत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी ?
तुझे हासरे हृदय आठवित, दुःखाची विसरते घडी
त्या हृदयाचा या हृदयाशी संगम रे होणार कधी ?
तू नसताना तुझी आठवण मना जाळिते पदोपदी
एक विचारु तुला ?
काय ?
होणार कधी गं सप्तपदी ?
tū najrene 'ho' mhaṭle mag vāchene vadṇār kadhī ?
kar paḍlet gaḻyāt tujhe paṇ varmālā paḍṇār kadhī ?
tujhe hāsre hṛday āṭhvit, duḥakhāchī visarte ghaḍī
tyā hṛdyāchā yā hṛdyāśhī saṅgam re hoṇār kadhī ?
tū nastānā tujhī āṭhavaṇ manā jāḻite padopdī
ek vichāru tulā ?
kāy ?
hoṇār kadhī gaṅ saptapdī ?