तू नभातले तारे माळलेस का तेव्हा
तू नभातले तारे माळलेस का तेव्हा
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा
आज का तुला माझे एवढे रडू आले
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा
हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
एक पान ही माझे चाळलेस का तेव्हा
चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा
tū nabhātle tāre māḻles kā tevhā
mājhiyāch svapnāṅnā gāḻles kā tevhā
āj kā tulā mājhe evḍhe raḍū āle
tū chitevrī aśhrū ḍhāḻles kā tevhā
he tujhe malā ātā vāchṇe surū jhāle
ek pān hī mājhe chāḻles kā tevhā
chuṅbilās tū mājhā śhabd śhabd ekāṅtī
oṭh nemke mājhe ṭāḻles kā tevhā