Too maajhyaa aayushyaachee pahaat

तू माझ्या आयुष्याची पहाट
Work
Language

तू माझ्या आयुष्याची पहाट
तू माझ्या कैफाची मत्त लाट

तू मागिल जन्मांची आर्त साद
तू मानसकुंजातील वेणूनाद
तू माझ्या एकांताचा प्रकाश
तू माझ्या गीतांचा बाहुपाश

तू माझ्या दुःखाची चांदरात
तू माझ्या स्वप्नांचा पारिजात
तू अमृतभासांचा अंगराग
तू विझल्या देहाचा दीपराग

तू माझ्या जगण्याची वाटचाल
तू माझ्या रक्ताचा रंग लाल
तू माझ्या असण्याचा अंश अंश
तू माझ्या नसण्याचा मधुर दंश

tū mājhyā āyuṣhyāchī pahāṭ
tū mājhyā kaiphāchī matt lāṭ

tū māgil janmāṅchī ārt sād
tū mānaskuṅjātīl veṇūnād
tū mājhyā ekāṅtāchā prkāśh
tū mājhyā gītāṅchā bāhupāśh

tū mājhyā duḥakhāchī chāṅdrāt
tū mājhyā svapnāṅchā pārijāt
tū amṛtbhāsāṅchā aṅgrāg
tū vijhalyā dehāchā dīprāg

tū mājhyā jagaṇyāchī vāṭchāl
tū mājhyā raktāchā raṅg lāl
tū mājhyā asaṇyāchā aṅśh aṅśh
tū mājhyā nasaṇyāchā madhur daṅśh