Te Majhe Ghar (Postatil Mulgi)

ते माझे घर
Language

ते माझे घर, ते माझे घर
जगावेगळे असेल सुंदर, असेल सुंदर

नक्षीदार अति दार तयाचे
शिल्प तयावर बुद्धकलेचे
चक्रे, वेली, मूर्ती मनोहर
जगावेगळे असेल सुंदर

अंगणी कमलाकृती कारंजे
वरी अप्सरा एक विराजे
झरतील धारा ओलेतीवर
जगावेगळे असेल सुंदर

आकार मोठा तरिही बैठा
आतुन वेरुळ आणि अजिंठा
वरी लालसर असेल छप्पर
जगावेगळे असेल सुंदर

पागोड्यांची शिखरे वळती
तशी छप्परे छपरावरती
कृष्णकमळीच्या वेली त्यावर
जगावेगळे असेल सुंदर