Sajana Re (Karaar)

साजणा रे, साजणा रे
Work
Year
Language

बांधते मन हळव्या गाठी
गुंतणे जरी नसते हाती
कधी कसे सूर जुळती आणि
भावते मग कुठले कुणी
हरवते जग नकळत सारे
हवेहवेसे कुणीतरी वाटे
सांग ना जीव झुरतो का रे
साजणा रे, साजणा रे

हा गंध आहे तुझा
की छंद लागे तुझा
धुंदावलेल्या स्पंदनांना

भांबावले मी कधी
समजावले मी कधी
नादावलेल्या पावलांना

ऐकुनी साद तू येशील का
साथ जन्मांची देशील का
हात हाती घेऊनि माझा
रंग स्वप्नांना देशील का
अनोळखी जग अवघे होते
उमलुनी मन हळवे गाते
सांग ना जीव झुरतो का रे
साजणा रे, साजणा रे

कळले मला ना कधी
होऊन गेले तुझी
स्वप्नी तुझे मी रंग ल्याले

एकांत माझा तुझा
का सांग झाला मुका
का भावनांना पंख आले

स्पर्श का रोमांचित झाले
श्वास ही गंधाळुन गेले
खेळ हा रात्रंदिन चाले
सारखा भासांचा का रे
बहरले जरी तनमन सारे
लागली तरी हुरहुर का रे
सांग ना जीव झुरतो का रे
साजणा रे, साजणा रे