रम्य ही स्वर्गाहून लंका
हिच्या कीर्तीचा सागर लहरी नादविती डंका
सुवर्णकमला परी ही नगरी
फुलून दरवळे निळ्या सागरी
त्या कमलावर चंद्र निजकरे, करितो अभिषेका
लक्ष्मी लंका दोघी भगिनी
उभय उपजल्या या जलधितुनी
या लंकेचे दासीपद तरी कमला घेईल का ?
रम्य ही स्वर्गाहून लंका
हिच्या कीर्तीचा सागर लहरी नादविती डंका
सुवर्णकमला परी ही नगरी
फुलून दरवळे निळ्या सागरी
त्या कमलावर चंद्र निजकरे, करितो अभिषेका
लक्ष्मी लंका दोघी भगिनी
उभय उपजल्या या जलधितुनी
या लंकेचे दासीपद तरी कमला घेईल का ?
ramy hī svargāhūn laṅkā
hichyā kīrtīchā sāgar lahrī nādvitī ḍaṅkā
suvarṇkamlā parī hī nagrī
phulūn daravḻe niḻyā sāgrī
tyā kamlāvar chaṅdr nijakre, karito abhiṣhekā
lakṣhmī laṅkā doghī bhaginī
ubhay upjalyā yā jaldhitunī
yā laṅkeche dāsīpad tarī kamlā gheīl kā ?