राजस सुकुमार, मदनाचा पुतळा
रवि शशि कळा लोपलिया
कस्तुरी मळवट चंदनाची उटी
रुळे माळ कंठी वैजयंती
मुगुट कुंडले श्रीमुख शोभले
सुखाचे ओतले सकळही
कासे सोनसळा, पांघरे पाटोळा
घननीळ सावळा, बाईयांनो
सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा
तुका म्हणे जीवा धीर नाही
राजस सुकुमार, मदनाचा पुतळा
रवि शशि कळा लोपलिया
कस्तुरी मळवट चंदनाची उटी
रुळे माळ कंठी वैजयंती
मुगुट कुंडले श्रीमुख शोभले
सुखाचे ओतले सकळही
कासे सोनसळा, पांघरे पाटोळा
घननीळ सावळा, बाईयांनो
सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा
तुका म्हणे जीवा धीर नाही
rājas sukumār, madnāchā putḻā
ravi śhaśhi kaḻā lopliyā
kasturī maḻvaṭ chaṅdnāchī uṭī
ruḻe māḻ kaṅṭhī vaijayaṅtī
muguṭ kuṅḍle śhrīmukh śhobhle
sukhāche otle sakaḻhī
kāse sonasḻā, pāṅghre pāṭoḻā
ghannīḻ sāvḻā, bāīyāṅno
sakaḻhī tumhī vhā ge ekīsvā
tukā mhṇe jīvā dhīr nāhī