राग म्हणू की अनुराग कळेना
धुंद ही हवा तरी फूल फुलेना
जवळ तू प्रिया की दूर कळेना
सूर मिळाले तरी गीत जुळेना
रूप लाडकी एक वल्लरी
अंग चोरिते लाजबावरी
लहर खेळवी तरी पान हलेना
धुंद ही हवा तरी फूल फुलेना
जीव भाबडा जाण नसावी
मुक्या मनी का प्रीत हसावी
भेटलो तरी सहवास मिळेना
सूर मिळाले तरी गीत जुळेना