Priya Aaj Aale

प्रिया आज आले मैफलीत माझ्या
Work
Language

प्रिया आज आले मैफलीत माझ्या
रंग सूर ल्याली पश्चिमा
गीतास आली लालिमा

तुझी साद ऐकूनी मी रे फुलारून आले
सुरातल्या चैतन्याने मीच गीत झाले
अमृतात न्हाली पौर्णिमा
प्राणात उमले चंद्रमा

हळूहळू निशिगंधाचे प्रीत स्पर्श प्याले
निशांत हा होता मी रे उषास्वप्न झाले
लाविता तुझ्या मी कुंकुमा
हासेल माझी नीलिमा