Priticha Zul zul Pani

प्रीतीचं झुळझुळ पाणी
Work
Year
Language

प्रीतीचं झुळझुळ पाणी
वाऱ्याची मंजुळ गाणी
रोमांच सर्वांगी, गेले मी न्हाऊनी
प्रीतीचं झुळझुळ पाणी

हा जीव वेडा, होई थोडा थोडा
वेड्या मनाचा बेफाम घोडा
दौडत आला सखे तुझा बंदा
चल प्रेमाचा रंगू दे विडा
साजणा, मी तुझी कामिनी

मी धुंद झाले, मनमोर डोले
पिसाऱ्यातुनी हे खुणावित डोळे
डोळ्यांत जाळे, खुळी मीच झाले
स्वप्न फुलोरा मनांत झुले
मी तुझा हंस ग मानिनी

ही तान नाचे आसावरीची
मांडी नव्हे ही उशी सावरीची
सोबत लाभे मला ही परीची
किती स्वाद घेऊ सरे ना रुची
साजणा वेळ का मिलनी