पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी
पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी
जीवनापासून माझ्या या मला मुक्ती मिळावी
वेदनेला अंत नाही अन् कुणाला खंत नाही
गांजणा-या वासनांची बंधने सारी तुटावी
संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा
कापलेले पंख माझे, लोचने आता मिटावी
सोबती काही जिवाचे मात्र यावे न्यावयाला
तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी
काय सांगावे तुला मी, काय मी बोलू तुझ्याशी
राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी
pūrttā mājhyā vythechī mājhiyā mṛtyūt vhāvī
jīvnāpāsūn mājhyā yā malā muktī miḻāvī
vednelā aṅt nāhī an kuṇālā khaṅt nāhī
gāṅjṇā-yā vāsnāṅchī baṅdhne sārī tuṭāvī
saṅplī mājhī prtīkṣhā, goṭhlī mājhī apekṣhā
kāplele paṅkh mājhe, lochne ātā miṭāvī
sobtī kāhī jivāche mātr yāve nyāvyālā
tārkāṅchyā māṅḍvākhālī chitā mājhī jaḻāvī
kāy sāṅgāve tulā mī, kāy mī bolū tujhyāśhī
rākh mī jhālyāvrī gīte tulā mājhī smrāvī