Mituni Lochane

मिटुनी लोचने घे भिरभिरती
Year
Language

मिटुनी लोचने घे भिरभिरती
सूर नांदीचे बघ दरवळती
लालचुटुक मखमली आता
अलगद ही उमलेल
भारुनिया अवकाशच अवघा खेळ नवा रंगेल

नवीन नांदी नवी संहिता
हवीहवीशी नवी भूमिका
पात्र होऊनी विरघळताना
गात्र गात्र बहरेल

प्रवेश सरला अंक बदलला
अंधारातच मंच मिळाला
पुन्हा तुझ्यास्तव याच तमातून
नवा मंच उजळेल