मीरेचे कंकण भक्तीचे दर्पण
स्मरे ते रंगून हरिनाम
पायीच्या पैंजणी बोलतो घुंगरू
कसे मी विस्मरू हरिरूप
गुंफिता अक्षरे एकतारी स्वरे
मनी त्या श्रीहरी भरलेला
श्रीहरी तयात झाला एकरूप
उजळला दीप अद्वैताचा
मीरेचे कंकण भक्तीचे दर्पण
स्मरे ते रंगून हरिनाम
पायीच्या पैंजणी बोलतो घुंगरू
कसे मी विस्मरू हरिरूप
गुंफिता अक्षरे एकतारी स्वरे
मनी त्या श्रीहरी भरलेला
श्रीहरी तयात झाला एकरूप
उजळला दीप अद्वैताचा
mīreche kaṅkaṇ bhaktīche darpaṇ
smre te raṅgūn harinām
pāyīchyā paiṅjṇī bolto ghuṅgrū
kase mī vismrū harirūp
guṅphitā akṣhre ektārī svre
manī tyā śhrīhrī bharlelā
śhrīhrī tayāt jhālā ekrūp
ujaḻlā dīp advaitāchā