मी मनात हसता प्रीत हसे
हे गुपित कुणाला सांगु कसे?
चाहुल येता ओळखीची ती
बावरल्यापरि मी एकांती
धुंद जीवाला डोळ्यांपुढती
नव्या नवतीचे स्वप्न दिसे
किंचित ढळता पदर सावरी
येता जाता माझी मला मी
एकसारखी पाहे दर्पणी
वेड म्हणू तर वेड नसे
काही सुचेना काय लिहावे
पत्र लिहू तर शब्द ना ठावे
नाव काढिता रूप आठवे
उगा मनाला भास असे