मस्त ही हवा नभी वाटते नवे नवे
तू जिथे तिथे तुझी धुंद मी तुझ्यासवे
स्पर्श हा तुझा प्रिया या जगात या क्षणी
सौख्य अर्पितो मला अमृतात नाहुनी
स्वप्न पाहता नवे पापणी हळू लवे
वेल बहरूनी वरी, गंध फेकीती कळी
प्रीत याहुनी नसे या जगात वेगळी
हात हा तुझा सखी जोवरी न सोडवे
मुग्ध भावनेतले गीत आज रंगूनी
धुंद प्रीत आळवी वेगळ्या स्वरातूनी
अर्थ तोच शब्दही जे तुला मला हवे