Mani Je Datle Tula Pahuni

मनी जे दाटले तुला पाहुनी
Work
Language

मनी जे दाटले तुला पाहुनी
सांगू कसे?
हृदय शब्दांत ग आणावे कसे
सांगू कसे?

क्षणी एकाच ओझरती
जराशी दिसुनी गेलीस तू
तरी मी का उभा वळणावरी ते सांगू कसे?

तुझ्या नजरेतली जादू
तुझ्या चालीतला डौल
कधी उतरेल ही भूल कशी ते सांगू कसे?

सुखाची गोड कळ दुखरी
कशाला देऊन गेलीस तू
अनाहूत त्या क्षणांचे गूढ नाते सांगू कसे?