Manasi Rajhans Pohato

मानसी राजहंस पोहतो
Work
Language

मानसी राजहंस पोहतो
दल दल उघडित नवनवलाने कमलवृंद पाहतो

नील जलावर धवल विहग तो
जलवलयांसह खेळ खेळतो
श्रीरामांच्या वक्षस्थली जणू, मौक्तिकमणि डोलतो

दिवास्वप्न की भास म्हणू हा
वनवासाचा ध्यास जणू हा
मनी वसे ते नयनांपुढती सजीवपणे रेखितो