मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते
कुठेतरी मी उभाच होतो, कुठेतरी दैव नेत होते
जरी जीवाला नको नकोशी, हयात हासून काढली मी
निदान जे दु:ख सोसले ते सुखात होते, मजेत होते
बघून रस्त्यावरील गर्दी, कशास मी पाहण्यास गेलो
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते
manāprmāṇe jagāvyāche kitī kitī chhān bet hote
kuṭhetrī mī ubhāch hoto, kuṭhetrī daiv net hote
jarī jīvālā nako nakośhī, hayāt hāsūn kāḍhlī mī
nidān je du:kha sosle te sukhāt hote, majet hote
baghūn rastyāvrīl gardī, kaśhās mī pāhaṇyās gelo
dhuḻīt bevārśhī kadhīche paḍūn mājhech pret hote