माझे मला कळेना, का सूर हा जुळेना
हृदयात दाटलेली हुरहूर साहवेना
गुलजार पापण्यांनी विणल्या अधीर ताना
धुंदावल्या स्वरांचा फुलला मनी तराणा
त्या लाजऱ्या नशेचा का कैफ हा सरेना
हाकारिते मनाला ती स्वप्नधुंद वाट
चुंबुनि बिंब जेथे घेई मिठीत लाट
ढळला निशा तरी का तो सोहळा विरेना
देहावरी सुखाच्या झरती अनंत धारा
मनमोर नाचतो हा फुलवून का पिसारा
या भरजरी व्यथेचा का अर्थ सापडेना