माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतींनी
माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी
जरा कानोसा देऊन कधी ऐकशील का रे ?
माझी धुळीतील चित्रे तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खोलून कधी पाहशील का रे ?
माझ्या जहाजाचे पंख मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनाऱ्यास दिवा कधी लावशील का रे ?
माझा रांगडा अंधार मेघामेघांत साचला
तुझ्या उषेच्या ओठांनी कधी टिपशील का रे ?
mājhyā mātīche gāyan tujhyā ākāśh śhrutīṅnī
jarā kānosā deūn kadhī aikśhīl kā re ?
mājhī dhuḻītīl chitre tujhyā prkāśh netrāṅnī
jarā pāpṇī kholūn kadhī pāhśhīl kā re ?
mājhyā jahājāche paṅkh madhyrātrīt mākhle
tujhyā kināऱyās divā kadhī lāvśhīl kā re ?
mājhā rāṅgḍā aṅdhār meghāmeghāṅt sāchlā
tujhyā uṣhechyā oṭhāṅnī kadhī ṭipśhīl kā re ?