माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साऊली
जैसी वत्सालागी गाय तैसी अनाथांची माय
हाकेसरशी घाई घाई वेगे धावतची पायी
आली तापल्या उन्हात नाही आळस मनात
खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम
विष्णूदास आदराने वारा घाली पदराने
माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साऊली
जैसी वत्सालागी गाय तैसी अनाथांची माय
हाकेसरशी घाई घाई वेगे धावतची पायी
आली तापल्या उन्हात नाही आळस मनात
खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम
विष्णूदास आदराने वारा घाली पदराने
mājhī reṇukā māūlī kalpvṛkṣhāchī sāūlī
jaisī vatsālāgī gāy taisī anāthāṅchī māy
hākesarśhī ghāī ghāī vege dhāvatchī pāyī
ālī tāpalyā unhāt nāhī āḻs manāt
khālī bais ghe ārām, mukhāvartī ālā ghām
viṣhṇūdās ādrāne vārā ghālī padrāne